इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाहीत,(spoke) असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला त्यांचा पुतळा शासनाचा नसून जनतेचा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.इचलकरंजीतील मलाबादे चौकात साकारण्यात आलेल्या ‘शंभूतीर्थ’च्या लोकार्पण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी स्वातंत्र्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाबण्याचे प्रयत्न झाले, अशी खंत व्यक्त केली. सीबीएससी अभ्यासक्रमात मुघलांच्या इतिहासाला मोठे स्थान दिले जात होते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला योग्य महत्त्व मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज हे एक तळपती तलवार होते. (spoke)त्यांनी नऊ वर्षे औरंगजेबाशी झुंज दिली आणि १२० लढाया लढून एकही लढाई हरले नाही, असे सांगत त्यांच्या पराक्रमाचा गौरव मुख्यमंत्र्यांनी केला. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिणारे, ११ भाषा जाणणारे आणि सूर्यासारखी प्रतिभा असलेले राजे म्हणून त्यांनी संभाजी महाराजांचे वर्णन केले.आमदार राहुल आवाडे यांनी शहरात निर्माण झालेल्या उत्सवी वातावरणाचा उल्लेख करत हा सोहळा लोकोत्सव असल्याचे सांगितले. आपल्या सरकारमुळेच हा पुतळा उभारण्यास मदत झाली, असेही त्यांनी नमूद केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शहरात निर्माण झालेल्या भगव्या वातावरणाचा उल्लेख करत हे भगवे वादळ कोणासाठीही भीतीचे नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी आमदार आवाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे तलवार देऊन स्वागत करण्यात आले. (spoke)संभाजीराव भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, गजानन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.याआधी मुख्यमंत्री फडणवीस नारायण मळा येथील हेलिपॅडवर दाखल झाले. त्यांनी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर शंभूतीर्थ येथे आगमन केले. या संपूर्ण मार्गावर जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी विकासकामांना मदत करताना इचलकरंजीच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका,(spoke) अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. या सोहळ्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. मलाबादे चौक ते जुनी नगरपालिका या मार्गावर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. भगव्या टोप्या आणि फेटे परिधान केलेली तरुणाई तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. शिव-शंभू महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *