राज्य शासनाने पुढील पाच वर्षांच्या जीएसटी परताव्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.(industries) लवकरच मनाप्रमाणे इचलकरंजीला जीएसटी परतावा मिळेल’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.येथील शिवतीर्थ येथे इचलकरंजी महापालिकेच्यावतीने शहरातील विविध विकासकामांच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे,शिवाजी पाटील, अशोकराव माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आमदार आवाडे, खासदार माने सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या माध्यमातून शहरात चांगली कामे सुरूच आहेत. इचलकरंजी महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी आहे. आता पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शहरातील औद्योगिकसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येईल.’

यावेळी कोनशिला अनावरण व ऑनलाईन पद्धतीने विविध १५ विकासकामांचे उद्‍घाटन (industries) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या विशेषांकाचे उद्‍घाटनही त्यांच्या हस्ते झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; लोकांना सुकर जीवनमान देणे हीच आमची प्राथमिकता महापालिकेच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, अशोक स्वामी, रवी रजपुते, रवींद्र माने, तानाजी पोवार यांसह प्रशासकीय अधिकारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

स्वागत आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले. आभार विजय राजापुरे यांनी मानले.(industries) महापालिकेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुमारे ३७५ कोटींच्या विकासकामांना निधी, शासनाकडून मार्च २०२६ अखेर थकीत सहाय्यक अनुदान रक्कम ४६२.०७ कोटी रक्कम देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच सन २०२२ ते २३ पासून ते मार्च २०२६ अखेर सुमारे १५९१.४५ कोटी रुपये जीएसटी कर परतावा द्यावा, अशा मागणीचे निवेदन आयुक्त पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

विकासकामांवर दृष्‍टिक्षेप …
श्रीमंत घोरपडे नाट्यगृह नूतनीकरण ९ कोटी ५० लाख
जिल्हा विकास नियोजन, शहर १६ कोटी ६५ लाख
माझी वसुंधरा अभियान ४ कोटी
निरामय रिंग रोड (industries) बळकटीकरण १२ कोटी
कूपनलिका दुरुस्ती १ कोटी ३० लाख
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर अभ्यासिका इमारत ५ कोटी २३ लाख
शहापूर दुर्गामाता मंदिर सभामंडप १ कोटी २२ लाख
दोन जलकुंभांचे उद्‍घाटन ५ कोटी ९७ लाख
पंचगंगा योजना जलवाहिनी बदलणे ४ कोटी ९९ लाख
पाच गावांतील ग्राम पंचायत उभारणे १ कोटी २५ लाख
खोतवाडी गजानन महाराज मंदिर तीर्थक्षेत्र विकास ३ कोटी
कुंभोज बाहुबली तीर्थक्षेत्राचा विकास १ कोटी ५० लाख
झेडएलडी प्रकल्प ३६१ कोटी.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचाEditEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *