बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात
लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आणि बीड लोकसभा (accident) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांचा विजय झाला. बजरंग सोनावणे व भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पॅटर्नमुळे भाजपाला मराठवाड्यात काहीसा धक्का मिळाल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे अखेर बजरंग सोनावणे यांनी विजय पक्का केला. त्यानंतर ते मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
बीडमध्ये निवडणूक अधिकारींकडून विजयाचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी लोकांसोबत जल्लोषामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ते मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले.(accident) त्याचवेळी बजरंग सोनवणेंच्या ताफ्यातील एक गाडी त्यांच्या गाडीला धडकली. या अपघातात काही जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर रात्री उशीरा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनावणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे जात असताना शहागड पुलाच्या बाजूला ताफ्यातील एक कार बजरंग (accident) सोनवणे यांच्या गाडीला येऊन धडकली. ताफ्यातील गाडी धडकल्याने बजरंग सोनवणे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. मात्र तिथून अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे सोनवणे यांनी भेट घेतली.
हेही वाचा :
पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण
टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी
मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार