प्लास्टिकच्या बाटलीत भरून पाणी पिणे हा आजच्या (hustle) घाईगडबडीत सर्वसामान्यांचा रोजचा भाग झाला आहे. मात्र, याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा आणि दावे सोशल मीडियावर वर्षानुवर्षे फिरत आहेत — विशेषतः, “प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिल्याने कर्करोग होतो” हा दावा लोकांमध्ये भीती निर्माण करतो. अलीकडेच एका व्हायरल पॉडकास्टमध्येही असाच इशारा देण्यात आला. त्यात म्हटलं गेलं की, प्लास्टिकची बाटली जर उन्हात कारमध्ये ठेवली किंवा पुन्हा पुन्हा वापरली, तर त्यातील रसायने पाण्यात मिसळून गंभीर आजार, अगदी कर्करोगासारखा, उद्भवू शकतो.

पण खरी परिस्थिती काय आहे? यामागे कोणते वैज्ञानिक पुरावे आहेत का? आरोग्य आणि कर्करोग संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थांनी स्पष्ट केले आहे की या दाव्यांना कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही.(hustle)कॅन्सर रिसर्च यूके आणि कॅन्सर काउन्सिल ऑस्ट्रेलिया यांच्या अहवालानुसार, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असलेली बिस्फेनॉल-ए (BPA) किंवा इतर प्लास्टिक संयुगे पाण्यात अतिशय सूक्ष्म प्रमाणात मिसळू शकतात. हे प्रमाण इतकं कमी असतं की त्यातून शरीरावर कोणताही कर्करोगजन्य परिणाम होतो, असा पुरावा अद्याप मिळालेला नाही.
इतकंच नव्हे तर, प्लास्टिकच्या बाटल्या गरम केल्याने किंवा फ्रीजमध्ये गोठवल्याने कर्करोगाचा धोका वाढतो, या दाव्यालाही वैज्ञानिकांनी फेटाळून लावले आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि वॉल्टर रीड आर्मी मेडिकल सेंटर या संस्थांच्या नावाने आधी अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर पसरवले गेले होते, पण दोन्ही संस्थांनी स्पष्ट केलं की त्यांनी असे कोणतेही संशोधन केलेलं नाही आणि हे दावे निराधार आहेत.

तज्ज्ञ मात्र हेही सांगतात की, जरी कर्करोगाचा धोका सिद्ध झालेला नसला, तरीही दीर्घकाळ प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्याने मायक्रोप्लास्टिक शरीरात जाऊ शकते. (hustle)मायक्रोप्लास्टिकच्या आरोग्यावरील दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास अजूनही सुरू आहे. त्यामुळे शक्य असल्यास स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करावा, हा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला आहे. थोडक्यात, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं म्हणजे थेट कर्करोगाचं आमंत्रण नाही, पण आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी पर्याय शोधणं शहाणपणाचं ठरेल.
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!