शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच निर्णय होणार आहे.(results) जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर फैसला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये कोर्टाने सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने वेबसाईटवर नवी तारीख टाकली आहे. त्यानुसार आता १८ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्ट निकाल देईल.

शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले. शिवसेना शिंदे गट (results) आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमचे असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांना दिले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नाव बदलून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे ठेवावे लागले आणि चिन्ह मशाल करावे लागले होते. या सर्व घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाने २०२३ मध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत याचिका दाखल केली.
शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने पक्ष (results) आणि निवडणूक चिन्ह दिले याला आव्हान देत ठाकरे गटाने याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाचा हा निर्णय असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ झाला या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र अद्याप कोर्टाने आपला निर्णय दिला नाही. त्यावर तारीख पे तारीख सुरूच आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे (results) या प्रकरणावर सुनावणी होणार होती पण ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली. २३ जानेवारीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी यावर सुनावणी होणार होती पण कोर्टाने सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली.आता १८ फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार असल्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा
महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली