जानेवारी महिना संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिना सुरु होईल.(banks) फेब्रुवारी महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. यानंतर देशातील अनेक गोष्टी बदलणार आहेत. दरम्यान, त्याआधी काही नियमात बदल केले आहेत. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार आहे. त्याचसोबत तंबाखूजन्य पदार्थ महाग होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

दर महिन्याच्या १ तारखेपासून एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर केल्या (banks) जातात. १ फेब्रुवारी रोजीदेखील सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर होणार आहे. पुढच्या महिन्यात बजेट सादर होणार असल्याने किंमती कमी होण्याची शक्यता आहे.पान मसाला, सिगारेटच्या किंमतीत वाढ होणार आहे. १ फेब्रुवारीपासून तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक कर लावण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तंबाखू, पान मसाला पदार्थांवर नवीन शुल्क आकारले जाणार आहे. पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लावण्यात येणार आहे.
FASTag च्याही नियमात बदल झाले आहेत (banks). आता फास्टॅग व्हेरिफिकेशनसाठी सक्ती नसणार आहे. याआधी वाहनाची KYV करणे गरजेचे होते. आता कार, जीप, व्हॅनसाठी व्हेरिफिकेशन करणे सक्तीचे नसणार आहे. बँकाच वाहनांच व्हेरिफिकेशन करणार आहे.फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे. दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि सणासुदीच्या दिवशी सुट्ट्या असणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सुट्टी असणार आहे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर