सरकारी बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते.(government) सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया एक्झिम बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. इंडिया एक्झिम बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करा. ही भरती आयबीपीएसद्वारे राबवली जात आहे. या नोकरीसाठी तुम्ही ibpsreg.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

इंडिया एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी तुम्ही १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचे आहे.(government) या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.इंडिया एक्झिम बँकेत डेप्युटी मॅनेजर बँकिंग ऑपरेशन्स पदासाठी भरती होणार आहे. या भरती मोहिमेत २० पदे भरली जाणार आहे. अर्जप्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी २१ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
इंडिया एक्झिम बँकेतील भरती लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. (government)या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४८४८० रुपये ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे.बँक डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत BA/PGDBA/PGDBM/MMS फायनान्स/ इंटरनॅशनल बिझनेस/ फॉरेन ट्रेडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. चार्टर्ड अकाउंटंट असणारे उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. पोस्ट ग्रॅज्युएशन २ वर्षांचे केलेले असावे. याचसोबत एक वर्ष कमर्शियल बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, स्टेट लेव्हल इन्स्टिटयूमध्ये काम केलेले असावे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर