2026 सालातील होळीचा सण यंदा विशेष ठरणार आहे.(zodiac) कारण 3 मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशीच चंद्रग्रहण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मेष, कन्या आणि मीन राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.याआधी 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत आता चंद्रग्रहण होत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून या कालावधीला महत्त्व प्राप्त झाले आहे. फाल्गुन पौर्णिमेला होणाऱ्या होलिका दहनावर ग्रहणाची छाया पडत असल्याने अनेकांमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढल्या आहेत.

वैदिक पंचांगानुसार, 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:16 वाजता (zodiac)चंद्रग्रहणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 7:52 वाजता ग्रहण समाप्त होईल. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने सुतक काळ पाळला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणकाळात पूजा-पाठ, शुभकार्य टाळले जातात आणि विशेष नियमांचे पालन केले जाते.होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. मात्र याच दिवशी ग्रहण येत असल्याने काही जण याला अशुभ संकेत मानत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणांचा परिणाम सर्व राशींवर होतो, परंतु काही राशींवर त्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

मेष राशीच्या व्यक्तींना नातेसंबंधांमध्ये तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता असून गैरसमज टाळण्यासाठी संयम राखणे गरजेचे आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नये, अन्यथा पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

कन्या राशीच्या लोकांना मानसिक तणाव आणि आर्थिक दबावाचा (zodiac)सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळणे आणि गुंतवणुकीबाबत सावध भूमिका घेणे हिताचे ठरेल. आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये.

मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अचानक बदल घडू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असून आर्थिक नियोजन बिघडू शकते. त्यामुळे बजेट सांभाळणे आणि मोठे व्यवहार पुढे ढकलणे योग्य राहील.

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, ग्रहणकाळात शांत राहणे, ध्यान-प्रार्थना करणे आणि वाद टाळणे फायदेशीर ठरू शकते. श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्ही बाजू लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत मित्रांकडून मित्राची निर्घृण हत्या; वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून टोकाचा निर्णय

मधुचंद्राच्या रात्री रोमान्स करत होतं नवविवाहित जोडपं, चुकून व्हिडिओ झाला लाइव्ह, सोशल मीडियावर व्हायरल

सावधान! १ एप्रिलपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार; तुमच्यावर काय परिणाम?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *