नांदेड नंतर आता सांगली जिल्ह्यातही हत्यांच्या मालिकेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Incidents) गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हत्यांच्या घटनांनी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगलीतील कवलापूर येथे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. यात्रेला गेलेल्या ३२ वर्षीय विश्वास कलाप्पा सुतार याचा त्याच्याच मित्राने खून केल्याची घटना उघड झाली. दारूच्या नशेत असताना झालेल्या किरकोळ धक्क्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की मित्रानेच सुतारच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कुपवाड परिसरात (Incidents) आणखी एक संशयास्पद मृत्यू समोर आला आहे. दगडू सुखदेव केंगार या ५५ वर्षीय बांधकाम कामगाराचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर मारहाणीचे स्पष्ट वळ असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. केंगार इचलकरंजी येथे काम करत होता. या प्रकरणात कुटुंबातील काही नातेवाईकांवर संशय घेत पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
यापूर्वीही सांगलीत अशाच प्रकारची एक निर्घृण हत्या घडली होती. जुना कुपवाड (Incidents) रस्त्यावरील दुधाळ कॉर्नर परिसरात २२ वर्षीय सौरभ महादेव पवार याचा पाठलाग करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात शाहीद समीर मुल्ला आणि आयान समीर भिस्ती या दोघांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार होता. दरम्यान, नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या गँगवॉरमध्ये पाच जणांची हत्या झाल्यानंतर आता सांगलीतही सलग घडणाऱ्या या घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभं ठाकलं आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!