सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुले कशा प्रकारे गुन्हेगारी जाळ्यात (criminal networks) ओढली जात आहेत, याचे एक विदारक उदाहरण छत्तीसगडमधील कवर्धा येथे समोर आले आहे. एका २६ वर्षीय विवाहित महिलेने १६ वर्षीय मुलाशी सोशल मीडियावर ओळख वाढवून, त्याला हॉटेलवर बोलावले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या (criminal networks) माहितीनुसार, १ मार्च रोजी हा सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपी महिलेने पीडित मुलाशी समाजमाध्यमांवरून संवाद साधण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मैत्रीचे रूपांतर भेटीच्या आग्रहात झाले. महिलेने मुलाला एका स्थानिक हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. विश्वासापोटी मुलगा तिला भेटायला गेला असता, तिथे महिलेने त्याच्यावर अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, या कृत्याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील तिने मुलाला दिली होती.
या घटनेनंतर पीडित मुलगा प्रचंड दहशतीखाली होता. त्याच्या वागण्याबोलण्यात अचानक झालेला बदल आणि मानसिक तणाव पाहून पालकांना संशय आला. पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. मुलाचा जबाब ऐकून हादरलेल्या पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पालकांच्या तक्रारीवरून कवर्धा पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल (criminal networks) केला असून तिला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे सोशल मीडियावरील वावर आणि त्यांचे अनोळखी लोकांशी होणारे संवाद यावर पालकांचे लक्ष असणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!