उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त आणि कामातील वक्तशीरपणा अनेकांनी पाहिला असेल. कधी कठोर तर कधी सौम्य अशी त्यांची ओळख आहे. मात्र, सोलापुरात घडलेल्या एका प्रकारानंतर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. इतकेच नाहीतर त्यांनी महिला(female) आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटीच केली. याबाबतचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे.

करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यातील कुई गावात रस्ता बांधकामासाठी बेकायदेशीर खडी उत्खनन केल्याच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान, गावकरी आणि अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना थेट फोन करून डीएसपी कृष्णा यांच्याशी बोलणी करून दिली. फोनवर अजित पवारांनी महिला आयपीएसना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण डीएसपी अंजली कृष्णा यांनी अजित यांना थेट त्यांच्या फोनवर फोन करण्यास सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार संतापले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिला अधिकाऱ्याला फटकारले.

एका महिला (female)आयपीएस अधिकाऱ्याने फोनवर त्यांना ओळखण्यास नकार दिला, तेव्हा पवारांचा राग अनावर आला. त्यांनी महिला अधिकाऱ्याला फटकारत म्हटले की, तुम्ही इतके धाडसी झाला आहात की, तुम्ही माझी ओळख विचारत आहात. जेव्हा मी तुमच्यावर कारवाई करेन तेव्हा तुम्ही मला ओळखाल. यानंतर अजित पवारांनी थेट व्हिडिओ कॉल करून महिला आयपीएस अधिकाऱ्याला फटकारले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, आता या कॉलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आता व्हायरल झाले आहे.

ही संपूर्ण घटना 31 ऑगस्ट रविवार दुपारची आहे, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे आणि अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीवर टीका होत आहे. या प्रकरणात, गोंधळ घालणाऱ्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सोलापूरच्या माढा तहसीलच्या कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अधिकारी केरळची असल्याचे सांगितले जात आहे, ज्यांची नुकतीच महाराष्ट्रात नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा :

Kolhapur : बोलता बोलता वाद झाला… आणि त्याने गळा चिरला!

मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळली Video Viral

पाण्याच्या बाटलीचं झाकण फक्त रंग नाही, आरोग्याचं गुपित सांगतं!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *