गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राजकीय (political)वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीच्या निमित्ताने ही चर्चा आणखी बळकट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) वतीने दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी आयोजित होणाऱ्या दीपोत्सवाचे उद्घाटन यंदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमध्ये सतत भेटीगाठी वाढल्या असून, आज (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. दादरमधील गोखले रोड परिसरात दीपोत्सवाच्या तयारी अंतिम टप्प्यात असून, शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या युवासेना कार्यकर्त्यांनी मोठमोठे आकाश कंदील लावले आहेत.

या कंदिलांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो एकत्र झळकवून ठाकरे कुटुंबाची एकता दाखवण्यात आली आहे. यंदा दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष राजकीय(political) महत्त्व प्राप्त झाले आहे.राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असा आहे की, ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची शक्यता जास्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंदी सक्तीविरोधातील एकत्र भूमिका, कौटुंबिक भेटीगाठी यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे दिसत आहे. नुकत्याच राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

मनसेने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे, ज्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा जोर धरली असून, महाराष्ट्राचे लक्ष आजच्या कार्यक्रमाकडे लागले आहे.
हेही वाचा :
पट्टणकोडोली यात्रेत 4 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला…
उद्धट पोरगं म्हणून हिणवणाऱ्यांना क्रिकेटरने सुनावलं, म्हणाला ‘अरे तो फक्त…’
लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना…