महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा गदारोळात आहे. लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशानंतरही राज्यातील विधानसभेत महायुतीने जोरदार विजय मिळवला, भाजप आणि महायुतीचे राजकीय वर्चस्व स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला फक्त ५० जागांवर समाधान मानावे लागले, तर महायुतीने तब्बल २३२ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवली.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांचा महायुतीकडे प्रवेश सुरू झाला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गटातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा प्रवेश झाला, ज्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला आहे. आता काँग्रेससाठी आणखी एक धक्का येण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी पुढील निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याचे सांगितले.

जर दिलीप माने काँग्रेसचा आधार सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे निश्चित झाले, तर ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा झटका ठरू शकतो. आगामी काही दिवसांत (Mahavikas Aghadi)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे, आणि काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा :

“तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

क्रिकेटचा नवा फॉरमॅट लाँच होणार, जाणून घ्या काय आहेत नवे नियम..

पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *