बॉलिवूडचा हँडसम अभिनेता हृतिक रोशन(actor) आणि त्याची एक्स-वाइफ सुझान खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घटस्फोटाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही या दोघांचे नाते आजही चर्चेचा विषय ठरते. नुकतेच सुझान खानच्या आई झरीन खान यांच्या निधनानंतर हृतिक पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबासोबत दिसला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे झरीन खान यांचा अंत्यसंस्कार मुस्लिम नव्हे तर हिंदू पद्धतीने करण्यात आला, ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

हृतिक आणि सुझान यांच्या लग्नाविषयीही एक मोठा खुलासा पुन्हा समोर आला आहे. फार थोड्यांना माहिती आहे की या दोघांचे लग्न ना हिंदू पद्धतीने झाले, ना इस्लामिक निकाह पद्धतीने. हृतिकने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे लग्न चर्चमध्ये अतिशय साध्या आणि खास पद्धतीने झाले होते. “आम्ही आमच्या इच्छेने लग्न केलं. चर्चमधील लग्न छोटे पण खूप सुंदर असतात. बेंगळुरूमध्ये आमचं लग्न झालं आणि आम्ही स्विमिंग पूलच्या मध्यभागी जाऊन एकमेकांना वचन दिलं,” असे हृतिकने सांगितले होते.
२००० साली झालेल्या या लग्नानंतर दोघेही बॉलिवूडमधील(actor) सर्वात चर्चित कपल बनले. त्यांनी दोन मुलांचं – रेहान आणि रिहान यांचं – पालकत्व स्वीकारलं. मात्र, काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे त्यांच्या नात्यात मतभेद वाढू लागले आणि २०१४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.आज हृतिक आणि सुझान दोघेही आपल्या आपल्या आयुष्यात पुढे गेले असले, तरीही मुलांच्या संगोपनासाठी आणि कौटुंबिक प्रसंगी ते एकत्र दिसतात. त्यांच्या या आधुनिक आणि परिपक्व वागण्याचं अनेक चाहते कौतुक करत आहेत.

हेही वाचा :
मोबाईल वापरणे होणार महाग! ‘या’ कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन वाढणार
हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….
अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास!