सकाळच्या नाश्त्यात अनेकांना गोड पदार्थ खायला खूप जास्त (paratha)आवडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मलाई पराठा बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. मुलांना कांदापोहे, उपमा, शिरा किंवा आलू पराठा खाण्याचा कायमच कंटाळा येतो. अशावेळी मुलांना नाश्त्यामध्ये नेमकं काय खाण्यास द्यावं? हा प्रश्न कायमच पालकांना पडतो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. कारण पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय लहान मुलांच्या (paratha) निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार अतिशय महत्वाचा आहे. रोजच्या आहारात खाल्ले जाणारे पदार्थ मुलांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यामुळे संतुलित आणि पोषण आहार देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मलाई पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मलाई खायला खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया मलाई पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
गव्हाचं पीठ
मीठ
साखर
तूप
वेलची पावडर
पीठ आंबवण्याची गरज नाही, रव्यापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत मेदू वडा; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
कृती:
मलाई पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तूप घालून मिक्स करा.
त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ असत पातळ मळू नये.
वाटीमध्ये दुधाची साय, साखर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्यात मलाई भरून पराठा लाटून घ्या.
तवा गरम करून त्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा. सगळ्यात शेवटी वरून तूप टाकून पराठा खाण्यासाठी सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मलाई पराठा.
हेही वाचा :
AI च्या मदतीने होमवर्क करणे आता शक्य नाही, कारण…
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ दिवसापासून ‘कोस्टल रोड’ २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार