इचलकरंजीत निवडणुकीची धामधूम; आजपासून उमेदवारी(filing)अर्ज दाखल करण्यास सुरुवात जोडण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना संभाव्य शक्तिप्रदर्शन टाळण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे आढावा बैठक घेतली आहे. अर्ज सादर करताना उमेदवारासह सूचक व अनुमोदक अशा केवळ तिघांनाच प्रवेश देण्यात येणार असून, प्रभाग समिती कार्यालयांकडे जाणारे मार्ग तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत. या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची महापालिकेतील (filing)‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवारी अर्जासोबत महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने, घरफाळा विभागात इच्छुकांनी गर्दी केली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, घनकचरा व्यवस्थापन शुल्क, बांधकाम परवाना शुल्क आदी विविध थकीत देयकांची तातडीने भरपाई करून प्रमाणपत्र मिळवण्यावर उमेदवारांचा भर आहे.वाढती गर्दी आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने घरफाळा विभागात ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे.

या ठिकाणी कर विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच इतर (filing)संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने थकबाकी तपासणी, भरणा आणि ना हरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ झाली आहे.या प्रक्रियेमुळे महापालिकेच्या तिजोरीत लक्षणीय भर पडली असून, उमेदवारांकडून थकीत देयके भरल्याने सुमारे २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग आला असून, महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी शहरात निवडणुकीची लगीनघाई सुरू झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक