लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी शेवटची (extension) तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी करायचे आहे. जर तुम्ही डेडलाइनपूर्वी केवायसी केले नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. दरम्यान, आता केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.लाडकी बहीण योजनेत केवायसी पूर्ण करण्यासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत. जर तुम्ही त्यापूर्वी केवायसी केले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता सरकार केवायसीसाठी मुदतवाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.(extension)लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूकीच्या काळात ही मुदतवाढ दिली जाऊ शकते. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळेच अद्याप याबाबत संभ्रम आहे.

लाडकी बहीण योजनेत अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही.(extension) त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डिसेंबर महिनादेखील संपायला आला आहे. त्यामुळे आता जानेवारीचाही हप्ता एकत्र देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक