स्विगी इन्स्टामार्टने त्यांचा इयर एन्डचा रिपोर्ट शेअर केला आहे.(purchases) स्विगीच्या ऑनलाइन App द्वारे 2025 या वर्षात भारतीयांनी काय खरेदी केली, त्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये खरेदीचे काही विचित्र ट्रेंड दिसलेत. चेन्नईमधील एका युजरने वर्षभरात 1 लाख 6 हजार 398 रुपये फक्त कंडोम खरेदीवर खर्च केले. त्याने स्विगीच्या ऑनलाइन App वरुन कंडोम मागवले. या युजरने 228 वेळा कंडोमची ऑर्डर केली. एका महिन्यात त्याने सरासरी 19 वेळा कंडोम मागवले. चेन्नईमधल्या एका सिंगल अकाऊंटवरुन 228 वेळा स्वतंत्र कंडोमची ऑर्डर करण्यात आली. त्याचं एकूण बिल झालं, 1,06,398 रुपये असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार कंडोम लोकप्रिय प्रोडक्ट ठरला. दर 127 ऑर्डरमागे 1 कंडोम पॅकेटची ऑर्डर होती. (purchases)सप्टेंबर महिन्यात कंडोम विक्रीमध्ये 24 टक्के वाढ दिसून आली. दुसऱ्याबाजूला मुंबईतील एका अकाऊंटवरुन 16.3 लाखाच्या रेड बुल शुगर फ्री ची ऑर्डर करण्यात आली. चेन्नईतील एका युजरने नुसते 2.41 लाख, पाळीव श्वानांच साहित्य ऑर्डर करण्यावर खर्च केले. बंगळुरुतील एका युजरने डिलिव्हरी पोहोचवणाऱ्यांना फक्त 68,600 रुपयांची टीप दिली. त्याने शहराची उदारता दाखवून दिली. त्याखालोखाल चेन्नईनमधील युजरने 59,505 रुपये टीप दिली. बंगळुरु भारताची फक्त टेक कॅपिटल नाही, तर टीप देण्यासाची सुद्धा कॅपिटल म्हणू शकतो.

नोएडामधील एकाने 2.69 लाख रुपये ब्लूटूथ स्पीकर, एसएसडी आणि रोबोटिक व्हॅक्युमवर खर्च केले.(purchases) तुम्हाला हे खूप महागडं वाटत असेल, तर हैदराबादमधील एका युजरने 4.3 लाख रुपये तीन आयफोन 17 वर खर्च केले. रिपोर्टनुसार व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी दर मिनिटाला गुलाबांच्या 666 ऑनलाइन ऑर्डर येत होत्या. इन्स्टामार्टच्या गिफ्टेबल फिचरनुसार, रक्षा बंधन, फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाइन्स डे हे भारतातील सर्वाधिक गिफ्ट देण्याचे दिवस ठरले. स्विगी इन्स्टमार्टनुसार, भारतीयांमध्ये डिजिटल शॉपिंगची सवय वाढत चालली आहे. आयफोन पासून किराणापर्यंत युजर्स सर्व प्रकारच्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करतायत.

हेही वाचा :

वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत

‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई

चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *