बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्माइलसाठी ओळखली जाते.(bollywood’s) पण यावेळी तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात ती पापाराझींवर रागाने ओरडताना दिसत आहे.
नेमकं घडलं काय? आलिया भट्ट एका पिकलबॉल गेमसाठी आली होती. गाडीतून उतरताच तिला दिसले की काही पापाराझी इमारतीच्या आवारात घुसून तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत.(bollywood’s) हे पाहून ती चांगलीच संतापली. व्हिडीओमध्ये ती पापाराझींना उद्देशून म्हणताना दिसते, ‘गेटमधून आत येऊ नका. ही तुमची इमारत नाही. कृपया बाहेर पडा. तुम्ही इथे येऊ शकत नाही आणि तुम्ही ऐकत का नाही?’ तिचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि कॅमेऱ्यात तो स्पष्ट दिसत होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट होताच नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी तिच्या निर्णयाचं समर्थन केलं, तर काहींनी तिने थोडं ओव्हररिॲक्ट केल्याचं म्हटलं.

याच आठवड्यात, आलिया भट्ट तिची आई सोनी राजदानसोबत ‘वॉर 2’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला देखील दिसली होती. (bollywood’s)14 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या दमदार अॅक्शन सिक्वेन्समुळे चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, पण प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता होती पोस्ट-क्रेडिट सीनबद्दल. त्यात YRF च्या पुढील मोठ्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ची पहिली झलक दाखवण्यात आली.

या झलकमध्ये बॉबी देओल एका लहान मुलीसोबत दिसतो, जी पुढील चित्रपट ‘अल्फा’मध्ये आलिया भट्टची भूमिका असण्याची शक्यता आहे. चाहत्यांचा अंदाज आहे की या चित्रपटात आलिया भट्टची भूमिका गुरु ते शत्रू अशा प्रवासावर आधारित असेल आणि ती तिच्या करिअरमधील सर्वात दमदार अॅक्शन लूकमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!