महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री (funeral) अजित पवार यांच्या अंत्यविधीला आज सकाळी बारामतीत शोकाकुल वातावरणात सुरुवात झाली. अजितदादांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्य हादरले असून, अखेरच्या दर्शनासाठी बारामतीत जनसागर उसळला आहे. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते, समर्थक, नागरिक आणि नेते बारामतीकडे रवाना झाले होते.

अजितदादांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.(funeral) ‘अजितदादा अमर रहें’, ‘नेतृत्व हरपले’ अशा घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी अश्रूंच्या साक्षीने श्रद्धांजली अर्पण केली. अंत्ययात्रेत महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परिसरात शिस्तबद्ध बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांचा कडक पहारा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे नेते, आमदार,(funeral) खासदार तसेच सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही अंत्यविधीला हजेरी लावली आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, धडाडीचा आणि निर्णयक्षम नेता गमावल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून येत आहे. शोकाकुल वातावरणात अखेरच्या निरोपाची तयारी सुरू असून, बारामती आज अक्षरशः अश्रूंनी न्हालेली आहे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर