राज्याच्या हवामानात गेले काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. (Farmers)आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. या हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.

मंगळवारी २७ जानेवारी रोजी पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. (Farmers)तर बऱ्याच ठिकाणी गारपीटांचा पाऊस देखील झाला. हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना काल यलो अलर्ट जारी केला होता. सायंकाळनंतर धुळे, जळगाव जिल्ह्यांत अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.धुळ्यातील शिरपूरच्या पूर्व भागात १० ते १२ मिनिटे गारपीट झाली. यामुळे थाळनेर, सावेर आदी गावांत मोठी हानी झाली. दरम्यान आज राज्यातील वातावरण ढगाळ स्वरूपाचे आहे. पहाटे अनेक ठिकाणी दाट धुक्यासह मोठ्या प्रमाणात दव पडल्याचे दिसून आले.
तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज देखील पावसाची (Farmers)शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी जोर धरला आहे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर