इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मोठे यश संपादन केले. इचलकरंजी महानगरपालिका शालेय शासकीय कराटे स्पर्धा नुकत्याच राजीव गांधी भवन येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील 19 वर्षाखालील गटामध्ये कु. हर्षदा पुजारी व कु. श्रेया लठ्ठे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर 17 वर्षाखालील मुली या वयोगटात कु. ज्ञानदा पुजारी व 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ऋषिकेश धारवट यांची देखील विभागीय स्पर्धेसाठी निवड(Selected) झाली.

सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस के. खाडे यांनी अभिनंदन केले. यावेळी ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. शशिकांत कुंभार उपस्थित होते.खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. विनायक भोई व प्रा. मुजफ्फर लगीवाले यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. महाविद्यालयातील प्राध्यापक स्टाफ प्रशासकीय स्थान व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंच्या या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या(Selected).
हेही वाचा :
गुगलने घेतला मोठा निर्णय; 2026 पासून Android यूजर्ससाठी ‘हे’ अॅप्स बंद
गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली,
टॉप १० टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..!