इचलकरंजी शहराचे नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) मा. श्री. विक्रांत गायकवाड साहेब यांची आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे भेट घेऊन उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. संघटनेतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहून साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा (Good luck)दिल्या. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सॅम संजापुरे, उपाध्यक्ष विजय तोडकर, खजिनदार रणधीर नवनाळे, सचिव सचिन बेलेकर व सदस्य अरुण काशीद, पंडित कोंडेकर, अंकुश पोळ, रसूल जमादार, राजू म्हेत्रे, मुबारक शेख, निहाल ढालायेत, अंजुम मुल्ला, संगीता होगे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार संघटनेने साहेबांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी नव्या जबाबदारीसाठी DYSP विक्रांत गायकवाड साहेबांना हार्दिक शुभेच्छा (Good luck)देण्यात आल्या तसेच आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकार संघटना पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन देण्यात आले. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि पत्रकार संघटना परस्परांमध्ये सातत्याने समन्वय ठेवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी उत्तम यशाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

डी के ए एस सी महाविद्यालयाच्या कराटे खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

गुगलने घेतला मोठा निर्णय; 2026 पासून Android यूजर्ससाठी ‘हे’ अ‍ॅप्स बंद

गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *