राज्यात येत्या आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (schools) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी अपघाती निधन झालं. या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात तीन दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे.(schools) जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग भडकली. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक, वैमानिक यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे समर्थकांवर शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (schools)आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही बारामतीसाठी रवाना झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच नाही तर अगदी दिल्ली पर्यंतच्या नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. तसेच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी देखील टाहो फोडला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा
महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली