राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा (Nationalist)आज विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्याला मोठा धक्का बसला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यात ३ राजकीय दुखवटा जाहीर करण्यता आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत ‘मी दमदार आणि दिलदार मित्र गमावला.’, असल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे.

मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, ‘महाराष्ट्रासाठी अतिशय (Nationalist)कठीण दिवस आहे. पवार कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. अतिशय अनाकलनीय परिस्थितीत अजित पवार गेले. अजित पवारांविषयी जनसामान्यांत मोठी आस्था आहे. अजित पवार हे संघर्षशील नेता होते. जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’अजित पवार यांच्या मृत्यूच्या घटनेवर विश्वास ठेवणं कठीण जातंय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या विकासात अजित पवारांचं मोठं योगदान होते. राज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. असं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. अजित पवार यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण होती. मी आणि एकनाथ शिंदे थोड्याच वेळात बारामतीला जाणार आहोत.’

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले आहेत. (Nationalist)त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार हे सगळे पुणे विमानतळावर १२:४० वाजता दाखल होतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बारामतीकडे रवाना होतील.

हेही वाचा :

कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा

महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली

Indian Railways: ट्रेनमध्ये दारू बाळगणं कायदेशीर आहे का? बाटली सापडल्यास किती दंड, अटक होणार की नाही—

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *